*खारघर सेक्टर ५ मधील प्लॉट नंबर १९आणि १०मधील गार्डनचे भूमिपूजन

 

प्रतिनिधी (पनवेल):-

.शत्रुघ्न अंबाजी काकडे मा.नगरसेवक, पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी, खारघर मंडलातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते व त्यांच्या स्थानिकांच्या उपस्थितीमध्ये माजी नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवार खारघर सेक्टर ५ मधील प्लॉट नंबर १९आणि १०मधील गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले
यावेळी पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांतजी ठाकूर, पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ.कविताताई चौतमल, अविनाश कोळी तसेच पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य मान्यवर उपस्थितीत होते.

भा ज पार्टी संघटना अनेक कार्यकर्ते सहकारी स्थानिक नागरिकांनी मिळून शत्रुघ्न अंबाजी काकडे यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देत लोकप्रतिनिधी म्हणून भविष्यात आपली अशीच प्रगती व्हावी व आपण समाज हीत जपत दीर्घायुष्य जगाव अश्या शुभेच्छा देण्यात आल्या .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.