वृषाली अरविंद सावळेकर यांना नवउद्योजकांचा पाऊलखुणा पुरस्कार देऊन सन्मानित…
प्रतिनिधी /पनवेल (साबीर शेख)
इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेल व कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने उद्योग व्यवसायात समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या उद्योजकां वृषाली अरविंद सावळेकर यांना दि.१४ ऑक्टोबर रोजी क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नट्यागृहात ‘नवउद्योजकांचा पाऊलखुणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार आमदार प्रशांत ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कोमसाप जनसंपर्कप्रमुख, रायगड भूषण एल बी पाटील पनवेल महानगरपालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
या कार्यक्रम दरम्यान वृषाली अरविंद सावळेकर यांना सांगितले की माजी आवडीला चालना सवळेकरनी दिली त्यामुळे मी माझा “नवउद्योजकांचा पाऊलखुणा पुरस्कार” आपले पती अरविंद सवळेकर यांनी समर्पित करते.
या कार्यक्रम दरम्यान हिंदी मराठी गाण्याची सुरेल माहिती ठेवण्यात आली होती, मान्यवरांचे स्वागत करण्यात आले
या कार्यक्रमाचे संयोजक इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी न्यू पनवेलच्या साधना धारगळकर व कल्पना कोठारी आणि कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले होते.