युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’च्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे दिनांक १२ ते २० जानेवारीपर्यंत
प्रतिनिधी/पनवेल
नौदल आयएनएस विक्रांत या जहाजाची प्रतिकृती महाराष्ट्राचे केंद्रबिंदू असलेल्या मंत्रालयात प्रदर्शनाच्या रूपाने पहायला मिळणार असून १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ साहेब जयंती व स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शनिवार, दि. ०७) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संस्कार भारती (कोकण प्रांत) व ओरायन मॉल पनवेल आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संपूर्ण भारतीय बनावटीची सर्वात मोठी युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’च्या प्रतिकृती प्रदर्शन मुंबई येथे दिनांक १२ ते २० जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
त्या संदर्भात माहिती देण्यासाठी पंचरत्न हॉटेल येथे पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर, संस्कार भारतीचे अँड. अमित चव्हाण तसेच संस्कार भारतीच्या कोकण प्रांत उपाध्यक्ष सुनिता खरे, रायगड विभाग प्रमुख सुलक्षणा टिळक, ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट..
संस्कार भारती व ओरायन मॉलच्यावतीने आयएनएस विक्रांत प्रतिकृती लोकांच्या हृदयात सामवण्यासाठी प्रदर्शनाच्या रुपात मांडण्यात आली. आणि त्याला पनवेलकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला… आमदार प्रशांत ठाकुर्
संस्कार भारतीचे महामंत्री अँड. अमित चव्हाण यांनी माहिती देताना सांगितले कि,जहाजाची प्रतिकृती संस्कार भारतीच्या चित्रविद्या विभागाचे प्रमुख सिद्धार्थ साठे यांच्या कडून बनविण्यात आली आहे.
आयएनएस विक्रांत भारतीय नौदलाच्या लढाऊ युद्ध लोकांची अधिक माहिती सर्वांना पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविण्यात येणार या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि पुढाकार लाभल आणि त्याचबरोबरीने ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांचे पाठबळ हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी नियोजित करण्यात आला आहे.