कोरोना काळात समाजामध्ये आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिक जागरूक होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी खारघर येथे आयोजीत रक्तदान शिबीरावेळी केले.

श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळ यांच्या वतीने आणि टाटा कॉन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर येथे रक्तदान शिबीर रविवारी अयोजीत करण्यात आले होते. या शिबीरामध्ये १५० हून अधीक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

खारघर येथील श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. त्याअंतर्गत खारघर सेक्टर २० येथे टाटा कॉन्सर हॉस्पिटलच्या सहकार्यांने रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

या शिबीराला नागरीकांचा उत्सफूर्द प्रतिसाद लाभला असून, १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या शिबीराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत श्री कच्छ वागड लेवा पाटीदार मित्र मंडळाने रक्तदान शिबीर आयोजीत केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.

तसेच भाजपचे खारघर शहर सरचिटणी दीपक शिंदे यांचे चिरंजीव श्‍लोक शिंदे याला वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या व रक्तदान केल्याबद्दल त्याला प्रमाणपत्र देऊन त्यांचे कौतुक केले.

या वेळी भाजपचे खारघर तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेचे नगरसेवक रामजी बेरा, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष बीना गोगरी, व्यापारी सेल संयोजक अंबालाल पटेल, वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे संयोजक विजय उजळंबे, आदर्श सोहनी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.