स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्या स्मृतीस रायगड कॉंग्रेसतर्फे अभिवादन.


            कोकणचे भाग्यविधाते, रायगडचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए. आर. अंतुले साहेब यांच्या २ डिसेंबर रोजी स्मृतिदिनानिमित्त रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष  महेंद्र घरत यांच्या उपस्थितीत उलवे येथील कार्यालयात अंतुले साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
           याप्रसंगी जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितले की, अंतुले साहेबांनी महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. साहेबांची निर्णयक्षमता, दूरदृष्टीपणा व प्रशासनावरील पकड, महाराष्ट्राला कायम लक्षात राहील. आज जो काही कोकणचा विकास झाला आहे तो फक्त अंतुले साहेबांमुळेच.
            अंतुले साहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी लोकनेते. दि. बा पाटील साहेब यांचे सुपुत्र. अतुल पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती.  वसंत काठावले, पनवेल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्नंदराज मुंगाजी, के. डी कोळी, अरुण कोळी, अश्विन नाईक, भरत गायकवाड, रुकेश काठावले व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.