राज्यात मध्यरात्री संचारबंदी असताना शासनाचे नियम मारले जात आहे फाट्यावर.

खारघर :(वार्ताहर)

राज्यातील कोरोना तिसरीलाट पुन्हा ढसळलि आहे. ओमिक्रॉनची वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यात पुन्हा रात्री 10 ते 7 जमावबंदी लागू झाली आहे.

खारघर मध्ये मध्यरात्री बदाम शेक फालुदा(आईस्क्रीम)गाड्या उशिरा रात्री १ वाजे पर्यंत चालू दिसुन आल्या आईस्क्रीम ची मज्जा घेण्या करता आईस्क्रीम प्रेमी मध्य रात्री घराबाहेर पडत आहे . सेक्टर २ लिटिल वर्ल्ड से.१०बँक ऑफ इंडिया, से. ७ क्रिस्टल प्लाझा,से.४ येरळा मेडिकल, से.१२ प्रणाम हॉटेल से.१३ डेली बाजार, से.२० शिल्प चौक, से.३५ महावीर टावर या ठिकाणी गाड्या रात्री १ वाजता दिसून आल्या .

राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ वाजे पर्यंत संचारबंदी असून या गाड्या उशिरा रात्र चालू असून पालिका याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 जानेवारी ला बैठक घेतली. यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशा प्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. विवाह समारंभ पार्ट्या असे प्रसंग लक्षात घेऊन कमीत कमी गर्दी कशी होईल या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत दिनांक 14 जानेवारी रोजी नवी नियमावली जाहीर करण्यात येणार आहे .

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.