कार्यतत्पर शेकाप. नगरसेविका डॉ सुरेखा विलास मोहोकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने माणेक नगर सोसायटीचा पाण्याचा प्रश्न सुटला
पनवेल (प्रतिनिधी)-
पालिका प्र. क्र.१८मधील मानेक नगर सोसायटीला अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने .नगरसेविका डॉ. मोहोकार यांना याची तक्रार मिळताच सोसायटीचे सभासद व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी अविनाश पाटील यांच्यासमवेत त्यांनी पाहणी करून घेतली .
पाण्याचा पुरवठा करणारे पाइप व वाँल्हव नादुरुस्त आणि खराब होऊन फुटल्याचे निर्दशनास आले. यावर ताबडतोब नव्याने पाइप टाकून देण्याचे काम सुरू करून घेण्यात आले. २३ मे ला हे काम पूर्ण करण्यात आले.याबद्दल सोसायटीच्या सदस्यांनी नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर यांचे व पनवेल महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या सर्व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. यासाठी मनेक नगर सोसायटीचे केतन शाह, वैशाली शाह,कोळी व महिलावर्ग उपस्थित होते.