क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्या वतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “नवी मुंबई रत्न पुरस्कार
जे एम म्हात्रे चारिटेबल ट्रस्ट ला नवी मुंबई रत्न पुरस्कार देण्यात आला.सन्मान स्वीकारताना ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे व त्यांचे चिरंजीव आराध्य व मुलगी उपस्थित होते

वर्ष २०२२”नवी मुंबई रत्न पुरस्कार ने जे एम म्हात्रे चारिटेबल ट्रस्ट चा सन्मान करण्यात आला.
प्रितम म्हात्रे यांनी हा पुरस्कार जे एम म्हात्रे ट्रस्ट व त्यांचे सहकारी हितचिंतक व सर्व साथीदारांना समर्पित केले व समाजात आपल्याला एक पाऊल पुढे येऊन एकमेकांच्या सुखाचं कारण बनाव म्हणून प्रयत्न करण्यासाठी केलेले हे कार्य आहे असे सांगितले
क्रेडाई एमसीएचआय नवी मुंबई युनिटच्यावतीने कोविड काळात महत्त्वपुर्ण काम केल्याबद्दल” नवी मुंबई रत्न पुरस्कार २०२२” चे वितरण वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी जे एम म्हात्रे चारिटेबल,पनवेल महापालिकेतील आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय अधिकारी डाॅ.आनंद गोसावी, सहाय्यक आयुक्त डाॅ.वैभव विधाते, संजय कटेकर ,डॉ. रेहाना मुजावर, डॉ. भक्तराज भोईटे, कोव्हिड हॉस्पिटल मैनेजमेंट व अधिपरिचारिका जेएनएम, आरोग्यसेविका एएनएम, माहिती नोंदणीकार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.