खालापूरातील योगिता पाटील यांना यशस्वी उदयोजिका पुरस्काराने सन्मानित
खालापूर –
आजच्या आधुनिक युगात महिला वर्ग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करित असल्याने अनेक महिलांनी वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात यश संपादन केल्याने अशा महिलांचा अनेक स्तरातून सन्मान होत असताना 11 मार्च रोजी महाराष्ट्र राज्यातील निवडक यशस्वी महिला उद्योजिकाचा खालापूरमधील माँंनटेरीया रिसॉर्टमध्ये कँट संस्थेकडून झेप उदयोगिनिंचा प्रस्तुत आयकाँनिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असता यात खालापूर तालुक्यातील द व्हिलेज रिसॉर्टच्या मालकीन योगिता निलेश पाटील यांना ही यशस्वी उद्योजिका महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने योगिता पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी अपर निजी सचिव सुक्ष्म लघू तथा मध्यम उद्यम मंत्री भारत सरकार – नवी दिल्ली संदीप पोखरकर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पालघर विवेक गायकवाड, कँट नँशनल अध्यक्ष प्रविण खंडेलवाल आदी प्रमुखासह मोठ्या संख्येने महाराष्ट्र राज्यातील यशस्वी महिला उद्योजिका उपस्थित होत्या.
कोरोनाच्या सावटातून सावरत योगिता निलेश पाटील यांनी आपला हाँटेल व्यवसाय सांभाळत अनेक महिलांना आदर्श दाखवून दिला असता योगिता पाटील यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे, तर योगिता पाटील यांच्या यशस्वी उद्योजकांची दखल घेत कँट संस्थेकडून झेप उदयोगिनिंचा प्रस्तुत आयकाँनिक पुरस्कारा अंतर्गत यशस्वी उद्योजिका महिला रत्न पुरस्काराने 11 मार्च रोजी सन्मानित केल्याने योगिता पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.