ऑनलाइन रजिस्ट्रेशन लिंक वर आवश्यक भेट द्या
htps:/ycea.in/youngIndia/index.html
भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी कृष्णा आलवारूजी ,युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवासजी बी.व्ही, राष्ट्रीय प्रवक्ते व या स्पर्धेचे महाराष्ट्राचे प्रभारी जयेश गुरणानी तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात “यंग इंडिया के बोल’ उपक्रमांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.

यंग इंडिया के बोल ही नॅशनल स्तरावर वक्तृत्व स्पर्धा भारतीय युवक काँग्रेस च्या वतीने घेण्यात येणार असल्याने यासाठी जास्तीत जास्त युवा पिढीने स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन पनवेल येथील काँग्रेस भावन पत्रकार परिषदेत करण्यात आले.
या स्पर्धेत मनमोकळा संवाद असेल व भाग घेण्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन शंभर रुपये असणार आहे.
गेल्याच वर्षी या वक्तृत्व स्पर्धेचा पहिला सीजन पार पडला. या स्पर्धेचा हा दुसरा सीजन आहे. प्रत्येक राज्यात ही स्पर्धा टप्प्याने पार पडली जाईल .
अंतिम स्पर्धेसाठी १० जणांची निवड होईल व कॅश प्राईज देखील घोषित करण्यात आली.

लोकशाहीच्या राजकारणात योग्य तो बदल घडवण्यासाठी आपले अधिकार हक्क सरकार पर्यंत पोहचण्यासाठी ,जुलमी दडपशाही असलेली अराजकता संपण्यासाठी ,युवा पिढीला विद्यार्थ्यांच्या मनातील विषय निर्भीडपणे मांडण्यासाठी युथ काँग्रेसचे यंग इंडिया के बोल का मंच उपलब्ध करून दिला आहे.
देशात सरकार पोषण न करता खाजगीकरण करून शोषण करत आहे .जुलमी कृषी ,कामगार कायदे ,महागाई , बेरोजगारी असे अनेक विषय आहेत ज्यावर नागरिक संतप्त आहेत. त्यासाठी १८ वयोगट ते ३५ वयोगटा पर्यंत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग ,रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश सचिव विश्वजीत पाटील ,पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल सावंत, राकेश जाधव, सुरज नरोटे, तुषार पवार, प्रमोद पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.